Sunday, April 23, 2023

वाटी आणि ताट

जेवायला नाही तिथे
वाटी आणि ताट ।
संसाराची कुठे ती
जाते बघा वाट ।

बघून चुलीला कशी
विझली हो आग ।
भुकेल्या पोटाला मग
येतो किती राग ।

पैश्याविना भाजी
येईल कशी घरात ।
धान्याच्या बाजारात
गहू पण महाग ।

गाळून घाम सारा
जातो दिवस कष्टात ।
उपाश्या पोटी झोप
चोळती डोळे अंधारात ।

गरीबाची ही कथा
कसे ते जगतात ।
रक्ताचे होते पाणी
तरीही हसतात ।
Sanjay R.


आले कुठून हे आभाळ

आले कुठून हे आभाळ
सुर्याविनाच होते सकाळ ।
बसले रुसून कसे नारायण
वाटतो त्यांना हा छळ ।
मधेच येतात थेंब पावसाचे
वाहते पाणी खळ खळ ।
मधेच जातो बघून थोडा
येऊन वारा सळ सळ ।
Sanjay R.


जवाबदारी

पूर्ण तर करावीच लागते
असेल जर जबाबदारी ।
कशाला करू मी विचार
ध्येय पुढे असल्या वरी ।
चारच पावले जायचे पुढे
वाटते तितके नसते भारी ।
विचारच खेचतात मागे
करता करता होते तयारी ।
Sanjay R.


शब्द

शब्द जणू विखरले
भोवती कानाच्या पसरले ।
मूक शब्दांची होती गाथा
कळेना उच्चार त्यातले ।
सहज पहिला करून उलगडा
जुळले भावनेशी आतले ।
मन होते जेव्हा निराश
वाटले कोण इथे कुठले ।
गालावर थेंब दोन पाण्याचे
पण होते अश्रू ते डोळ्यातले ।
Sanjay R.


Wednesday, April 19, 2023

हवा संमान

प्रत्येकाला हवा असतो मान
तेच वाढविते त्याची शान ।
नका करू विचार कशाचा
कोण मोठा कोण लहान ।
नक्कीच मिळेल तुम्हास ही
द्या थोडा प्रत्येकास सम्मान ।
Sanjay R.