Wednesday, April 19, 2023

थोडं तुझं थोडं माझं

जीवनाचा हाच नियम
थोड तुझ थोड माझं ।
नसेल जिथे काहीच
तिथे सांगा काय कुणाचं ।

पाऊल एक तुझे एक माझे
भवसागरही होतो पार ।
एकमेकांच्या साथीनेच
क्षण होतात कसे ते सार ।
Sanjay R.


विश्वासघात

नको कुणावर विश्वास
जवळचेच करतात घात ।
दूर दूरच सारे बरे
नको कुणाची साथ ।
संकटात सापडाल तेव्हा
दिसतील त्यांचेच दात ।
Sanjay R.


आघात

करशील किती घात
हृदयावर होती आघात ।
नाही कुणाची साथ
हवा आता फक्त हात ।
Sanjay R.

Wednesday, April 12, 2023

चालानं येऊ फिरून

चालाना येऊ फिरून
जाऊ दूर मस्त ।
हाफ तिकीट लागते
पडते ना हो स्वस्त ।

येसटी नच जा लागन
मग कुठं बी उतरा ।
यात्रा बरी घडन वो
गाव फिरू ना सतरा ।

जाऊ जाऊ मुन तुमी
नेलं च कुठं आतावरी ।
चार धाम झाले असते
पर केलं तुम्ही म्हतारी ।

आता न्हाई नोका म्हनू
यंदा जाचच आपल्याले ।
पांडुरंगानं बलावल
काई कायते का तुमाले ।

रंग्या मंग्या ऱ्हाउ द्या
दोघच आपून जाऊ ।
पूना मुंबई बी तिकड
डोये भरून पाहू  ।

समुद्राच मले बी हो
हाय लयच येड ।
आंघोय करू तिथं
काडू त्याचीबी छेड ।

चाला बर उठा आता
बॅग तुमची भरा ।
म्या ठीवली भरून
आता निंगा तरा तरा ।
Sanjay R.


Wednesday, April 5, 2023

कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या एप्रिल 2023 च्या मासिक अंकात माझी "जगणे जीवनाचे" ही कविता प्रकाशित झाली. संपादकांचे खूप खूप आभार .