Tuesday, April 4, 2023

ऊन लागलं तपाले

ऊन लागलं तपाले
डोईवर न्हाई शेला ।
नागर हाये धराचा
पाय बैल कुठं गेला ।

त्याले बी लागते ऊन
मारते झाडाले रेला ।
पानी पानी होते जीव
शोधू कुठं मी पेला ।

मांगच साल पाहा कस
देवानं पाऊस किती देला ।
कथा म्हणु का व्यथा
शेतकरी पाण्यानच मेला ।

डोये लागले अभायाले
नवस बायकोन केला ।
पीक होऊ दे म्हने बर
मंग घेउ आपनही शेला ।
संजय रोंघे
नागपूर


येकदा तू हो म्हण

हवा तुझा होकार
एकदा तू हो म्हण ।
तुटेल कुठे प्रण पण
जुळेल माझे मन ।

येकदा तू हो म्हण
वेचील मी सारे कण ।
होईल जीवन सुखाचे
आनंदाचे सारे क्षण ।

येकदा तू हो म्हण
नाही प्रश्न हा गहन ।
असू दे वाट दुःखाची
करू सोबत सारे सहन ।
Sanjay R.


रुसवा तुझा भारी

नाही चां तुझा पाढा
बोलणार कधी हो ।
किती बघायची वाट
नको तर, म्हण तू नो ।
हट्ट तुझा असा कसा
कळेना मलाही तो ।
रुसवा ही तुझा भारी
त्याला देना थोडा खो ।
Sanjay R.


जसं हो म्हणावं

तुझ्या हो ला मी
जसं हो म्हणावं ।
नाही ला नाही
तेही तुला कळावं ।

मनात तुझ्या काय
मन मनाशी जुळावं ।
येणारं संकट ही मग
ते सहजच टळावं ।

नको सोडू तू असे
वय लागलं सोळावं ।
आग लागली तनात
त्यात तूही पोळावं ।
Sanjay R.

Monday, April 3, 2023

भक्ती

करू नकोस तू युक्ती
नाही मिळणार मुक्ती ।
मिळण्या मनासारखे
लागते करावी भक्ती ।
त्याच्या विना आहे कोण
जाणावी त्याची शक्ती ।
देवा मलाही असू देरे
जीवनात तुझी आसक्ती ।
Sanjay R.