Tuesday, April 4, 2023

रुसवा तुझा भारी

नाही चां तुझा पाढा
बोलणार कधी हो ।
किती बघायची वाट
नको तर, म्हण तू नो ।
हट्ट तुझा असा कसा
कळेना मलाही तो ।
रुसवा ही तुझा भारी
त्याला देना थोडा खो ।
Sanjay R.


जसं हो म्हणावं

तुझ्या हो ला मी
जसं हो म्हणावं ।
नाही ला नाही
तेही तुला कळावं ।

मनात तुझ्या काय
मन मनाशी जुळावं ।
येणारं संकट ही मग
ते सहजच टळावं ।

नको सोडू तू असे
वय लागलं सोळावं ।
आग लागली तनात
त्यात तूही पोळावं ।
Sanjay R.

Monday, April 3, 2023

भक्ती

करू नकोस तू युक्ती
नाही मिळणार मुक्ती ।
मिळण्या मनासारखे
लागते करावी भक्ती ।
त्याच्या विना आहे कोण
जाणावी त्याची शक्ती ।
देवा मलाही असू देरे
जीवनात तुझी आसक्ती ।
Sanjay R.


आठवा जरा जुना काळ

आठवा जरा जुना काळ
घर भरून असायचे ।
सगळेच येका छताखाली
मिळून मिसळून हसायचे ।

आजी आजोबा काका काकू
सगळेच सोबत बसायचे ।
एकमेका आधार त्यांचा
सुख दुःख वाटून जगायचे ।

तुटले आता ते जुने घर
प्रत्येकाला वेगळे राहायचे ।
सासू नको सासर नको
सांगा एकटेच काय बघायचे ।

मोबाईल ने तर केला दगा
सांगे येकटे कसे जगायचे ।
म्हातारपण तर किती कठीण
त्यांना कुणी सावरायचे ।
Sanjay R.


संयुक्त कुटुंब

उरलेच कुठे आता
जुने ते संयुक्त कुटुंब ।
पोट पाणी नोकरी
हा जीवनाचा स्तंभ ।

उदरभरण नाही सोपे
वाताहत झाली कुटुंबाची ।
घर सुटले दार तुटले
कथा हीच जीवनाची ।

आई बाप उरले मागे
जगतात ते उपाशी ।
तडफडतो आत्मा त्यांचा
ढाळतात आश्रु उशाशी ।
Sanjay R.