लय झालं बावा
मलेच देली भुल ।
म्हने घेना गुलाब
लव यू अतुल ।
म्या मनल बापू
कायले खातं झुल ।
घिऊन घेन गुलाब
नसेना मी अतुल ।
लोचाच झाला बावा
तिकुन आला प्रफुल ।
म्हने बनला कानी तू
आता एप्रिल फूल ।
Sanjay R.
लय झालं बावा
मलेच देली भुल ।
म्हने घेना गुलाब
लव यू अतुल ।
म्या मनल बापू
कायले खातं झुल ।
घिऊन घेन गुलाब
नसेना मी अतुल ।
लोचाच झाला बावा
तिकुन आला प्रफुल ।
म्हने बनला कानी तू
आता एप्रिल फूल ।
Sanjay R.
नको भुतांचा संग
अजब त्यांचा ढंग ।
माणूस लागे घुमायला
बुध्दी होते भंग ।
विचित्र ती वागणूक
करतात किती तंग ।
दूर दूरच राहायचे
दुरूनच बघायचे रंग ।
दचकून नका जाऊ
करू भुतांशी जंग ।
भ्रमित व्हाल तर
येतील भूत संग ।
😀
Sanjay R.
विद्रूप तुझा चेहरा
विचकट तुझे इशारे ।
भुताटकीचा खेळ सारा
पळा तोडून पहारे ।
भूत म्हणू की हडळ
वेगळेच तीथले वारे ।
वाटलीस जणू झोंबी
केली बंद मी दारे ।
तोडून दार तू आली
कोण चंद्र कुठले तारे ।
थांबलेत श्वास माझे
होते ते स्वप्न सारे ।
Sanjay R.
सुखाचे दिवस किती
दुःख कुणाच्या हाती ।
दिवसा मागून दिवस हे
सुख दुःख घेऊन येती ।
क्षण तर चारच प्रेमाचे
आहे तीच खरी प्रीती ।
आयुष्यभर जपू या
प्रेमाची हीच नाती ।
जीवनाची वाट ही
फक्त हात हवा हाती ।
जगायचे तर आहेच
हवी कशास भीती ।
Sanjay R.
आयुष्य कुठे लहान
बघा करून महान ।
सगुणांची ती शान
त्यांचाच होतो मान ।
करावे तितके थोडे
करू या गुण गान ।
हवी तीच आन
नाहीतर मोकळे रान ।
स्वार्थ होतो जागा
आणि सुटते सारे भान ।
लागतो भोगावा मग
पदोपदी आपमान ।
उलटून बघा येकदा
आयुष्याचे पान ।
सुंदरतेनी भरलेले
असेल तितकेच छान ।
Sanjay R.