जन्मापासून होते सुरू
जीवनाची नवीन वही ।
रोज भरायचे ऐक पान
कर्माचा तो आलेख पाही ।
Sanjay R.
Monday, April 3, 2023
Sunday, April 2, 2023
बस एक चहा
थकवा आला पाहा
हवा एक चहा ।
मैत्रीचा दुवा पाहा
बस एक चहा ।
पाहुणे आले घरी
त्यांना ही चहा ।
कंटाळा आला आता
फ्रेश होण्यास चहा ।
काहीच नाही करायला
चला पिऊ या चहा ।
Sanjay R.
एक कप चहा
एक कप चहा
रुपये पडतात दहा ।
पिताच मिळे उत्साह
डोकेदुखी होते स्वाहा ।
मित्र मंडळी जमती जिथे
रंगती गप्पा सोबत चहा ।
न होणारे ही काम होई
चहा ची हीच करामत महा ।
Sanjay R.
कोण ती
प्रेमात कुठे शांती
आठवणीत जळते पणती ।
नका विचारू हो असे
आहे कोण ती ।
प्रीत जडली जिच्याशी
आहे तीच प्रीती ।
कल्पनेच्या वलयात
वसते या मनात ती ।
Sanjay R.
सासू सुनेची आई
कशी होईल सासू
तिच्या सुनेची हो आई ।
मधे दोघींच्या तर आहे
खोल किती ती खाई ।
आई मायेची पाखर
गोड किती ती साखर ।
सासू कडू लिंबाचे पान
कशी भासते ती प्रखर ।
भांडे सासा सूना दोघी
लोक आजूबाजूचे बघी ।
होई शब्दा शब्दात वाद
नाते नसेल असे जगी ।
भाव आईचा कसा बघा
नेला हिसकावून पोरगा ।
प्रेम किती तिच्या अंतरात
वाटे केला सूनेनेच दगा ।
सून कशी ती बिचारी
जीव लावते नवऱ्यावरी ।
गोंधळ होतो हो आईचा
प्रेम तिचे मुलावर भारी ।
Sanjay R.

Subscribe to:
Comments (Atom)