Sunday, April 2, 2023

सासू सुनेची आई

कशी होईल सासू
तिच्या सुनेची हो आई ।
मधे दोघींच्या तर आहे
खोल किती ती खाई ।

आई मायेची पाखर
गोड किती ती साखर ।
सासू कडू लिंबाचे पान
कशी भासते ती प्रखर ।

भांडे सासा सूना दोघी
लोक आजूबाजूचे बघी ।
होई शब्दा शब्दात वाद
नाते नसेल असे जगी ।

भाव आईचा कसा बघा
नेला हिसकावून पोरगा ।
प्रेम किती तिच्या अंतरात
वाटे केला सूनेनेच दगा ।

सून कशी ती बिचारी
जीव लावते नवऱ्यावरी ।
गोंधळ होतो हो आईचा
प्रेम तिचे मुलावर भारी ।
Sanjay R.


लेक ती तू सासू

सांग ना मला जरा
आई कशी ग तू सासू ।
सुनेचे करते लाड
पण देत नाही बसू ।
नेहमी असते कामात
सरले ग तिचे हसू ।
राग आला की तू ग
होतेस कशी रुसू ।
राबवू नको ग सूनेस
कर लेक ती तू सासू ।
Sanjay R.


नको छेडू मज

नको छेडू मज
रात्र खूप झाली ।
धुंदी या डोळ्यांत
झोपेची ही आली ।

दिवसा झाले काम
आता हरी नाम ।
तू राधा माझी
मी तुझा ग शाम ।

नको ना छेडू मज
झोप मज आली ।
धुंद प्रेमात झालो
बघ ओठावर लाली ।
Sanjay R.


उदास तू असा

नको वाटते मज
काय तुझी तऱ्हा  ।
का उदास तू असा
बघ डोळ्यात जरा ।

भरून आभाळ इथे
मन मोकळा तू बरा ।
थेंब दोन गालावर
पुस डोळे रे जरा ।

सुख दुःख हे जीवन
आहे नशिबाचा फेरा ।
हसत होईल रे पार
तोड आता तू घेरा ।
Sanjay R.


भावनांचा सागर

भावनांचा सागर
सोबतीला विचार ।
शोधतो  मी पार
काढू कसा सार  ।

पेलवेना भार
प्रेम आहे आधार ।
मन हे बंद दार
सोसते कुठे हार ।

शब्दांनाही धार
पण नाही आकार ।
चुकतो जेव्हा उकार
सरतो तिथे होकार ।

अंतरा वरती मार
काळजात प्रहार ।
जीवनाची तार
थांबते मग सतार ।
Sanjay R.