Sunday, April 2, 2023

भावनांचा सागर

भावनांचा सागर
सोबतीला विचार ।
शोधतो  मी पार
काढू कसा सार  ।

पेलवेना भार
प्रेम आहे आधार ।
मन हे बंद दार
सोसते कुठे हार ।

शब्दांनाही धार
पण नाही आकार ।
चुकतो जेव्हा उकार
सरतो तिथे होकार ।

अंतरा वरती मार
काळजात प्रहार ।
जीवनाची तार
थांबते मग सतार ।
Sanjay R.


साक्षीला चंद्र तारे

तो आणि ती
गुंतले धागे सारे ।
नजरानजर झाली
आले प्रेमाचे वारे ।

ठेऊन असतो नजर
त्यात करतो इशारे ।
चोरून ती बघते
जणू स्टिंगचे कॅमेरे ।

गाठ भेट व्हावी आता
मोजतो मनात तारे ।
तिच्याही अंतरात तो
हवे हवे वाटे सारे ।

प्रेम गेले फुलत
तुटले सारे पहारे ।
झाले ऐक दोघे
साक्षीला चंद्र तारे ।
Sanjay R.


अंतरात सलतो काटा

कठीण जीवन किती
अशा कशा या वाटा ।
नसेल जायचे तरीही
मिळतो मागून रेटा ।
सुख इथे कमी पण
भारी दुःखाचा पाटा ।
हृदय उरलेच कुठे हो
अंतरात सलतो काटा ।
Sanjay R.


सांगतो मी राजा

सांग तू राजा
आहे रे कुठे मजा ।
सदा असतो धावत
वाटते मला सजा ।

गाव सुटले आणि
शहरी मी आलो ।
पैश्याची हाव आता
लालची किती झालो ।

रहायला रे खोली
हवे वाटते घर ।
गावच्या अंगणाची
नाही रे इथे सर ।

सकाळची बैठक
पळतो मी कुठे ।
घड्याळीच्या कट्यावर
सारे धावत सुटे ।

नाही क्षणाची उसंत
चाले दिवसभर काम ।
पूजा नाही पाती
विसरलो मी राम ।

काळ लोटला इथे
सूर्य बघितला कधी ।
ऊन वाऱ्याचा चटका
पाऊस रे गावा मधी ।

हिरवे रान कुठे
इमारतीचे झाले जंगल ।
आई बाप तिकडे
हीच मनात रे सल ।

शोधतो रोज मी
काळया मातीचा वास ।
उभ्या उभ्या कसा रे
थांबतो इथे श्वास ।

सांगतो मी राजा
याद गावाची येते ।
नाही माणुसकी इथे
काढून काळीज नेते ।

नको वाटते सारे
गाव होता रे बरा ।
कपटी सारेच इथे
हृदयात तिथेच झरा ।
Sanjay R.


यश तुझ्याच हाती

नको सोडू तुझे प्रयत्न
यश तुझ्याच हाती आहे ।
मनात असेल जर इच्छा
घडणार अगदी तसेच आहे ।

मनात गुंफले तू जे स्वप्न
साक्षातही अगदी तेच आहे ।
नको बघू तू वळून मागे
सोबतीला मी तुझ्याच आहे  ।

मान जराशे तू आभार त्याचे
सदा सदैव तो तुझाच आहे ।
अंतर नको तू देऊ त्यास
परमेश्वराची ही साथ आहे ।
Sanjay R.