Sunday, April 2, 2023

जीवनाची गाथा

झेलू किती मी व्यथा
आसवांची ही कथा
काळजात दुःख सारे
हीच जीवनाची गाथा
Sanjay R.


बोनस

कशास हवा हो बोनस
कर्तव्याची नाही जाण ।
एका वर एक पाहिजे फ्री
तोच वाटते आम्हा मान ।
घेऊन घेऊन मिरवतो
त्यात कशाची आहे शान ।
Sanjay R.


दिवाळी बोनस

दिवाळी म्हणजे काय
घ्यायचे काही निराळे ।
नवे कपडे नवी वस्तू
वाट पाहतात सगळे ।
येणार आता बोनास
करायचे काही आगळे ।
Sanjay R.

खिडकीच्या पलीकडे

खिडकीच्या पलीकडे
खुले आसमान ।
अलीकडे मात्र कसे
काळोखाची खाण।

एकीकडे अनोखी
निसर्गाची शान  ।
वधून घेते नजर
आणि हरपते भान ।

नको नको काळोख
कुठे प्रकाशाची वान ।
तिथेच हो तुमचे
हारपेल भान ।
Sanjay R.


चिमणी दिवस

खिडकीतून जेव्हा बघायचो
मज चिमणीच तिथे दिसायची ।
चिव चिव तिचा आवाज गोड
घाईत किती ती असायची ।
आजूबाजूचा घेऊनिया वेध
मिळेल ते दाणे ती टीपायची ।
हरवली काही आता ती
चिव चिव मज जरा ऐकायची ।
Sanjay R.