Sunday, April 2, 2023

आधार

मनात एकच विचार
डोकावतो वारंवार ।
नाही त्याला सार
नाही कुठला आधार ।

कळेना काय प्रकार
होतो डोक्याला भार ।
हवा असतो होकार
पण मिळतो नकार ।

मन होते तार तार
अंतरात जणू प्रहार ।
निराशेची ती खाई
शब्द पडेना चकार ।

कशी ही व्यथा
कसा हा संसार ।
परत वाटते मग
हवाच एक आधार ।
Sanjay R.


बिनधास्त तुम्ही जगा

नको काळजी नको चिंता
थोडे धैर्याने तुम्ही वागा ।
जीवन हे सुंदर किती
बिनधास्त तुम्ही जगा ।
मोह माया नकोच आता
धरू प्रेमाचा एकच धागा ।
सुख दुःख येतील जातील
करू नका कशाचा त्रागा ।
Sanjay R.

मन जडले

ये मेरा दिवाना पन था की
कळत नकळत सारे घडले ।
नशिबाचाच खेळ सारा
कळलेच नाही कोण कुठे पडले ।
सगळीच झाली पागल पंती
पता नहीं घोडे कुठे अडले ।
डोळ्यात नाही अश्रू
पण म्हणतात सगळेच रडले ।
कुणास ठाऊक कसे ते
मन माझे तिच्यावर जडले ।
Sanjay R.


कळत असो वा नकळत

कळत असो वा
असो नकळत ।
ऐकायचे फक्त
आता मनाचे ।
नको ते सोडून
हवे तेच बघायचे ।
सुख दुःख सोबती
आनंदात जगायचे ।
झाले गेले विसरून
फक्त हो हसायचे ।
Sanjay R.



Saturday, April 1, 2023

कळत नकळत

कळत नकळत
कधी होतात चुका ।
किंमत चुकवायचा
मग असतो धोका ।
डोक्याला होतो ताप
कोणी बघतो मोका ।
सावरून मनाला
वेळीच टोका ।
Sanjay R.