खिडकीतून जेव्हा बघायचो
मज चिमणीच तिथे दिसायची ।
चिव चिव तिचा आवाज गोड
घाईत किती ती असायची ।
आजूबाजूचा घेऊनिया वेध
मिळेल ते दाणे ती टीपायची ।
हरवली काही आता ती
चिव चिव मज जरा ऐकायची ।
Sanjay R.
Sunday, April 2, 2023
चिमणी दिवस
ट्याव ट्याव
तुझी नजर नी माझी माजर
नाही कशातच फरक ।
मिटून डोळे ते बघतात
जणू सांगतात तू सरक ।
घारे घारे डोळे कसे
गारगोटी जणू वाटतात ।
श्रीखंड असो वां आईस्क्रीम
चटकन कशा चाटतात ।
ऐक करते म्याव म्याव
दुसरी ची तर ट्याव ट्याव ।
शांती हवी हो मला
दूरच असा ना राव ।
Sanjay R.
चकवा
सारखा असतो फिरत
कुठे जायचे कळेना ।
जणू चकव्याने भुलवले
रस्ताच मज मिळेना ।
मनात जे माझ्या
काहीच कसे जुळेना ।
नको जे वाटते
तर तेही का टळेना ।
Sanjay R.
कधी जमलेच नाही
बिनधास्त असे ते वागणे
मला कधी जमलेच नाही ।
नेहमीच असते मनात धास्ती
स्वप्नात जगतो अगदी शाही ।
तेच ते जगणं तेच ते वागणं
जीवाची होते हो लाही लाही ।
देऊन आता सोडून सारे
रोज वाटते करायचे काही ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)