Wednesday, March 29, 2023

नाही तिथे प्रकाश

वाट ती अज्ञानाची
नाही तिथे प्रकाश ।
गर्द काळा काळोख
माणुसकीचा विनाश ।
ज्ञान हेच विज्ञान
तोडी जुने सारे पाश ।
उजळून निघेल मग
भासेल सुंदर आकाश ।
Sanjay R.


उडवायचे रॉकेट

गळ्यात फुटके लॉकेट
म्हणे उडवायचे रॉकेट ।

दिवस रात्र करायचे वेट
लाचार सारे होत नाही भेट ।

Sanjay R.


Saturday, March 18, 2023

तुझी माझी मैत्री

तुझी माझी मैत्री
अनोखी ही किती ।
नसेल नात्यात जशी
तशी आहे ना प्रीती ।

नाही कशाचा स्वार्थ
नाही कुठली निती ।
तरीही जुळली कशी
काळजी पण किती ।

बंध असू दे असाच
फुलवू आपण नाती ।
अखंड असेल प्रीत
तेवेल अशीच ज्योती ।
Sanjay R.


मुंबई लोकल

मुंबईत आमच्या, गर्दी तुफान
तीच तर आहे, लोकलची शान ।

घड्याळीचा काटा, चाले जसा
लोकलनेही घेतला, तोच वसा ।

सारखी धावते, फुरसतच नाही
असू दे ना गर्दी, पण वाटते शाही ।

भेद भाव नाही, गरीब वा श्रीमंत
सगळ्यांना घेते, नाहीच हो अंत ।

संसाराला मदत, जगण्याचा आधार
उचलते तीच, सगळ्यांचाच भार ।

कल्पनाच नको, तिच्या नसण्याची
सारेच थांबेल, प्राणवाहिनी मुंबईची ।
Sanjay R.

Friday, March 17, 2023

भरले डोळे त्यात पाणी

जीवन माझे ऐक कहाणी
भरले डोळे त्यात पाणी  ।
शब्दात होते अर्थ मनाचे
शब्द थांबले वदली वाणी ।

नाही उरले त्राण तनात
उरले सुरले हात हे दोन्ही ।
वाट कुणाची पाहू आता
सारे सरले नाही कोणी ।

वर आकाश खाली धरती
कोण कुठला इथला दाणी ।
नको वाटते जगणे आता
गाऊ कसा मी जीवन गाणी ।
Sanjay R.