तुझी माझी मैत्री
अनोखी ही किती ।
नसेल नात्यात जशी
तशी आहे ना प्रीती ।
नाही कशाचा स्वार्थ
नाही कुठली निती ।
तरीही जुळली कशी
काळजी पण किती ।
बंध असू दे असाच
फुलवू आपण नाती ।
अखंड असेल प्रीत
तेवेल अशीच ज्योती ।
Sanjay R.
तुझी माझी मैत्री
अनोखी ही किती ।
नसेल नात्यात जशी
तशी आहे ना प्रीती ।
नाही कशाचा स्वार्थ
नाही कुठली निती ।
तरीही जुळली कशी
काळजी पण किती ।
बंध असू दे असाच
फुलवू आपण नाती ।
अखंड असेल प्रीत
तेवेल अशीच ज्योती ।
Sanjay R.
जीवन माझे ऐक कहाणी
भरले डोळे त्यात पाणी ।
शब्दात होते अर्थ मनाचे
शब्द थांबले वदली वाणी ।
नाही उरले त्राण तनात
उरले सुरले हात हे दोन्ही ।
वाट कुणाची पाहू आता
सारे सरले नाही कोणी ।
वर आकाश खाली धरती
कोण कुठला इथला दाणी ।
नको वाटते जगणे आता
गाऊ कसा मी जीवन गाणी ।
Sanjay R.
कोण कुठे नी कशास तू
कळेना मज पण मनात तू ।
शून्यात कधी बघतो जेव्हा
हरवतो मी आणि स्वप्नात तू ।
शोधते नजर का कुणास
नजरेत असतेस तेव्हाही तू ।
मिळते नजरेस नजर जेव्हा
भासते मला की हसतेस तू ।
ओढ म्हणू की प्रेम मी
सदा असते अंतरात तू ।
सहज लागते उचकी जेव्हा
तेव्हाही असते आठवणीत तू ।
Sanjay R.