Saturday, March 18, 2023
मुंबई लोकल
मुंबईत आमच्या, गर्दी तुफान
तीच तर आहे, लोकलची शान ।
घड्याळीचा काटा, चाले जसा
लोकलनेही घेतला, तोच वसा ।
सारखी धावते, फुरसतच नाही
असू दे ना गर्दी, पण वाटते शाही ।
भेद भाव नाही, गरीब वा श्रीमंत
सगळ्यांना घेते, नाहीच हो अंत ।
संसाराला मदत, जगण्याचा आधार
उचलते तीच, सगळ्यांचाच भार ।
कल्पनाच नको, तिच्या नसण्याची
सारेच थांबेल, प्राणवाहिनी मुंबईची ।
Sanjay R.
Friday, March 17, 2023
भरले डोळे त्यात पाणी
जीवन माझे ऐक कहाणी
भरले डोळे त्यात पाणी ।
शब्दात होते अर्थ मनाचे
शब्द थांबले वदली वाणी ।
नाही उरले त्राण तनात
उरले सुरले हात हे दोन्ही ।
वाट कुणाची पाहू आता
सारे सरले नाही कोणी ।
वर आकाश खाली धरती
कोण कुठला इथला दाणी ।
नको वाटते जगणे आता
गाऊ कसा मी जीवन गाणी ।
Sanjay R.
तूच तू
कोण कुठे नी कशास तू
कळेना मज पण मनात तू ।
शून्यात कधी बघतो जेव्हा
हरवतो मी आणि स्वप्नात तू ।
शोधते नजर का कुणास
नजरेत असतेस तेव्हाही तू ।
मिळते नजरेस नजर जेव्हा
भासते मला की हसतेस तू ।
ओढ म्हणू की प्रेम मी
सदा असते अंतरात तू ।
सहज लागते उचकी जेव्हा
तेव्हाही असते आठवणीत तू ।
Sanjay R.
Monday, March 13, 2023
हवा पैसा
करू कुणावर विश्वास
नाही कुणाचा भरोसा ।
स्वर्थीच आहेत इथे
सगळ्यांना हवा पैसा ।
माया ममता प्रेम सरले
पैसा पैसा आहे कैसा ।
झाला माणूस क्रूर किती
जणू माजलेला भैसा ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)