Monday, March 13, 2023

पहिली भेट

बघतो तुज क्षणोक्षणी
तुजसारखे नाही कोणी ।
हसणे तुझे बघणे तुझे
वेड लागले माझ्या मनी ।

आठवते ती पहिली भेट
शब्द सूचेना बंद ओठ ।
बघत राहिलो चेहरा तुझा
सांगून गेले डोळेच गोष्ट ।
Sanjay R.


दंडाचा भेव

साम न्हाई दाम न्हाई
दंडाचा हाये मोठा भेव ।
बसते लहान तोंड कुन
पर आनला बावा चेव ।
Sanjay R.


एक विचार

नेण्या कुठले कार्य सिद्धीस
येतात अडचणी अपार ।
करुनिया मात त्यावर
मिळवायचा आधार ।
साम दाम दंड भेद
उपयोगी सारे विचार ।
सुटेल मग सारे कोडे
वाटेल कसा तो भार ।
Sanjay R.


साम दाम दंड भेद

जीवनाची वाट कठीण
घेऊ कसा मी त्याचा वेध ।
विचारांती ठरवले सारे
करायचे साम दाम दंड भेद ।
Sanjay R.


दिशाहीन वाटा

दिशा हिन या वाटा
पदोपदी टोचतो काटा ।
वेदना साठल्या मनात
सारख्या येतात लाटा ।

अश्रू साठले डोळ्यात
हुंदका थांबून गळ्यात ।
दुःखाला मिळेना वाट
सारे भरून या मनात ।

कोण मी आहे कुठला
प्रवासी या वाटेवरचा ।
अनोळखी झाली वाट
विसरलो पत्ता घरचा ।

ऐकतो गजर रामनामाचा
देह कुणाच्या खांद्यावर ।
जायचे कुठे मज कळेना
सुटले सर्वस्व त्या चितेवर ।
Sanjay R.