Saturday, March 11, 2023

आहे कुणी मनात

येते मज आठवण
आहे कुणी मनात ।
नकळे मज काही
काय तिच्या मनात ।

बघतो मी जेव्हा
सदा असते हसत ।
बघताच आले नाही
असते केव्हा रुसत ।

नजरेला मिळता नजर
असते चमक डोळ्यात ।
बोलतात डोळे काही
ती सांगेल का शब्दात ।

डोळे माझेही वाटेवर
ते सारेच जाणतात ।
ओठांना संदेश माझा
ऐकायचे काय बोलतात ।
Sanjay R.


रंग पंचमी धमाका

रंग मिठाई आणि उत्साह
तालावर नाचायचे लावून गाणी ।
त्यासाठी थोडी एनर्जी हवी
शोधतात मग रंगीत पाणी ।

अडखळतात पाय आणि
मग होतात अनवाणी ।
पत्ताच नसतो कशाचा
शौकिनांची हीच कहाणी ।
Sanjay R.


जाऊ नको दूर

जाऊ नको दूर
मनात हुर हूर ।
थांबेना उचकी
जातास तू दूर ।

मिटेना डोळे मग
येतो त्यात पूर ।
दाटतो गळा माझा
लागेना मग सुर ।

स्वप्नही पडेना
तेही किती चतुर ।
परतून ये सखे
मन झाले आतुर ।
Sanjay R.


Thursday, March 9, 2023

कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ मार्च 2023 च्या अंकात माझी कविता प्रकाशित , संपादकांचे आभार 🙏

स्त्री शक्ती

विविध रूपांनी नटलेली
स्त्री ही एकच शक्ती ।
रुपगुणांचा ठेवून मान
चला करुया तिची भक्ती ।

अंबा ती काली ही ती
झाशीची तर राणी ती ।
लढते ती जेव्हा जेव्हा
होते कशी मर्दानी ती ।

आश्रु जरी असेल डोळ्यात
नका समजू तिला अबला ।
शिकून सवरून झाली मोठी
आहे तीच तुमची सबला ।

अर्धांगिनी ती होऊन येते
देते घरपण तुमच्या घरा ।
मान सन्मान तीस द्या जरा
कष्टाची तिच्या कदर करा ।

आई बहीण मुलगी तीच
ठेवी जपून सारी नाती ।
घराचा ती सांभाळ करी
घेऊन संसाराची दोरी हाती ।
Sanjay R.