Wednesday, March 8, 2023

काय म्हणू या मनाला

काय म्हणू या मनाला
आहे हे हळवे किती ।
असले मनात तर
जुळतात ना नाती ।

मनाचीही आहे व्यथा
तुटले की होते गाथा ।
सुटले की मग मात्र
का ठणकतो माथा ।

मन असते कुठे स्थिर
कधी फिरे भिर भिर ।
थांबत नाहीच कुठे
कधी मग सुटतो धीर ।

आनंदात विहरते कधी
उंच उंच आकाशात ।
दुःख झाले की मात्र
भासते आहे काळोखात ।
Sanjay R.


गजरा

अंगणात आज मझ्या
फुलला कसा मोगरा ।
इवल्या इवल्या फुलांचा
बांधला सुरेख गजरा ।
दरवळला सुगंध दूर
डोईवर दिसे साजरा ।
झाला आनंद किती
चेहरा बघा हसरा ।
Sanjay R.


देई सुगंध मोगरा

माळला केसात गजरा
देई सुगंध मोगरा ।
मिरवते आज आहे
घालून रंगीत घागरा ।
Sanjay R.


एकच त्या शब्दात

एकच त्या शब्दात
सामावले सारे ।
तुझ्या माझ्या प्रेमाचे
चमचमतात तारे ।

हसतेस तू जेव्हा
मन म्हणे वाह रे ।
आठवण येता तुझी
मिळती मज इशारे ।

तू तिथे मी इथे
दुरावा तो नाही रे ।
मनात ज्या भावना
सांगतात त्या सारे ।
Sanjay R.


आली होळी आली

आली आली होळी आली
गालावर दिसे रंगाची लाली ।
बघून चेहरा ओळख पटेना
वाटे जणू आहे तो मवाली ।

पळस हिरवा झाला लाल ।
कसे रंगात रंग  मिळाले
भासे बहुरंगी ती शाल ।

राधा झाली वेडी शोधी
आहे कुठे तो कान्हा ।
रंग उधळून गेला कसा
हवा त्यास ऐक बहाना ।
Sanjay R.