इति पासून अंता पर्यंत
जीवनाची एकच कथा ।
डोलतो होऊन कठपुतळी
घरोघरी एकच व्यथा ।
सुखासोबत भोगतो दुःख
आयुष्याची होते गाथा ।
मुखावरती दिसे हास्य
अंतराचीही तीच प्रथा ।
Sanjay R.
Thursday, March 2, 2023
जीवनाची कथा
कठपुतळी
झाला माणूस इथे कठपूतळी
नाचतो इशाऱ्यावर इतरांच्या ।
हातात स्वातःच्या आहे काय
कठीण या वाटा जीवनाच्या ।
Sanjay R.
हास्य गालावर
दुःख इथे पावलोपावली
डोळ्यात आसवांच्या धारा ।
दाखवीतो हास्य गालावर
तिथेही दुःखाचा पहारा ।
दुःखात शोधतो आनंद
जातो विसरून इशारा ।
बघतो दूर मी आकाशात
चमचमतो तिथेही तारा ।
Sanjay R.
जगणे जीवनाचे
जगतो ते जीवन
हसतो तो आनंद ।
दुःख तर पाठीशी
तरी असतो धुंद ।
नेत्रांनी बघायचे
सुख ते भोगायचे ।
हसत हसतच
जीवन जगायचे ।
आशेचा तेवे दीप
मन कधी आतुर ।
दुःखात जळे मन
मग डोळ्यात पुर ।
जगणे जीवनाचे
तोच आहे आधार ।
सरे दिवस मग
कुठे उरे विचार ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)