Wednesday, March 1, 2023

भावनांची झाली राख

उजाडले हे आयुष्य
भावनांची झाली राख ।
क्षण आता तो आला
नाही कुणा कुणाचा धाक ।

ओसाड पडली शहरे इथली
माणसांचा नाही कुठे पत्ता ।
जिकडे तिकडे आगीचे डोंब
काळया आभाळाची तिथे सत्ता ।

वर्चस्वाची ही लढाई
कोण मोठा कोण महान ।
मातीत मिळाले सारे काही
नाही उरले कुणास भान ।
Sanjay R.


नजरा इथे विषारी

नको बघू काही
नजरा इथे विषारी ।
नको बोलू काही
शब्दही इथे दुधारी ।

ठाऊक कुणास चव
विषाची नको परीक्षा ।
जो तो दिसे इथे
घेऊन जहरी दीक्षा ।

आभास असतो सारा
वाटे अमृताची धारा ।
बघूनच ठेवा पाऊल
नाही कळणार इशारा ।
Sanjay R.

Tuesday, February 28, 2023

शब्द झाले फितूर

शब्दातून तुझ्या मी
काढू कसा तो अर्थ ।
वाटले विषारी बाण
नाही मज तो स्वार्थ ।

शब्दात दिसे भावना
भावनेत असे मन ।
शब्द झालेत फितूर
निराकार झाले तन ।

नको आता उजळनि 
उजाडली परतीची वाट ।
जायचे विसरून आता
झाली मोकळी गाठ ।
Sanjay R.

शब्दांची उकल

तुझ्या शब्दांची
होत नाही उकल ।
शोधतो अर्थ सारे
घेतो शब्दांची दखल ।

सांगून जातात कधी
शब्द शब्दांचाच अर्थ ।
कळते मग मलाही
प्रयास सारेच ते व्यर्थ ।

सांगू कुणास मी कसे
मनात आहे ऐक आशा ।
शब्द हवा मज एक
नको त्यातून निराशा ।
Sanjay R.

Monday, February 27, 2023

नको दाखवू अभिमान

नको दाखवू अभिमान
खोटी तुझी रे शान ।
फुकाचा रे हा मान
कळे साऱ्यासी छान ।

बघ होऊन तू लहान
होशील किती महान ।
न मागता मिळेल
तुज सारा मानपान ।

मिरवतील जन सारे
हरपेल तुझे भान ।
मोठा होऊनही वाटेल
सुंदर तुझेच ध्यान ।
Sanjay R.