Wednesday, December 14, 2022

असते तू नसते

असते तू नसते
मला मात्र दिसते ।

नजर चोरून बघते
तशीच गालात हसते ।

दूर कुठे तू असते
हृदयात माझ्या वसते ।

जेव्हा तू रुसते
हवी हवी वाटते ।

रागावली की मात्र
गळा माझा दाटते ।

तू सदा बोलावं
नी मी ऐकावं वाटते ।

अबोल असताना तू
डोळ्यात बघावं वाटते ।

स्वप्न जेव्हा बघतो
त्यातही तू असते ।

मनच नाही लागत
जेव्हा तू नसते ।
Sanjay R.



Tuesday, December 13, 2022

चला जाऊ देवा घरी

चला....
जाऊ देवा घरी....
आहे तिथे हरी....
असेल भले सारे
वाटते इथल्या परी....

मंदिरात कुठे देव
ते नदीच्या तीरी....
भजन तिथे करून....
भोजन आपल्या घरी...

भुकेले हे पोट...
त्यास कष्टाची चाकरी...
रात्रन दिवस खपून
नाही पोट हे भरी.....

उपवास नको आता...
पोटात लागल्या सरी.....
रिकाम्या पोटाला हो
हवी ऐक भाकरी......

वाहतो संसाराची धुरा....
रोज होते एक वारी....
स्वप्न पाहता पाहता
दिवस जातो भारी....

गरीबाची ही कहाणी
वाटते कुणा खरी...
भोग भोगतो सारे
नाही वाटत बरी....

चला....
जाऊ देवा घरी....
आहे तिथे हरी....
असेल भले सारे
वाटते इथल्या परी....

Sanjay R.


Monday, December 12, 2022

शब्दांची किमया

शब्दांची होते किमया
त्यात जीवनाचा सार ।
कधी करती ते घात
सुटतो पायाचा आधार ।

शब्दांनी जुळते नाळ
फुलते नात्याची माळ ।
कधी घेती वेध अंतराचा
हृदयात होतो जाळ ।

शब्दांनी भरतो प्याला
गोड अमृत त्याला ।
कधी वाटती ते काटे
करती घायाळ मनाला ।
Sanjay R.


ओळख

ओळख कशास हवी
अनोळखीच बरे ।
गुपित राहू दे सारे
नाही काहीच खरे ।

जग वाईट इथे
माणसेही वाईट ।
झोल झाल आत
वरूनच ते टाईट ।

शब्दांच्या मोहाचे जाळे
तोही ऐक सापळा ।
जातील चिरून कधी
कळणार नाही गळा ।
Sanjay R.


शोधू तुला मी कोठे

शोधू तुला मी कोठे
जग आहे किती हे मोठे ।
थकले डोळे हे आता
दिसते नजरेस सारे खोटे ।

शोधण्या माणूस निघालो
ठिकठिकाणी आहेत गोटे ।
ओलावा गेला सरून
मन झाले किती ते छोटे ।

स्वार्थ दडला मनात
ध्यास लागलेत मोठे ।
वाटतो माणुसकीचा अंत
भरलेत त्यानीच पोटे ।
Sanjay R.