Wednesday, December 14, 2022
Tuesday, December 13, 2022
चला जाऊ देवा घरी
चला....
जाऊ देवा घरी....
आहे तिथे हरी....
असेल भले सारे
वाटते इथल्या परी....
मंदिरात कुठे देव
ते नदीच्या तीरी....
भजन तिथे करून....
भोजन आपल्या घरी...
भुकेले हे पोट...
त्यास कष्टाची चाकरी...
रात्रन दिवस खपून
नाही पोट हे भरी.....
उपवास नको आता...
पोटात लागल्या सरी.....
रिकाम्या पोटाला हो
हवी ऐक भाकरी......
वाहतो संसाराची धुरा....
रोज होते एक वारी....
स्वप्न पाहता पाहता
दिवस जातो भारी....
गरीबाची ही कहाणी
वाटते कुणा खरी...
भोग भोगतो सारे
नाही वाटत बरी....
चला....
जाऊ देवा घरी....
आहे तिथे हरी....
असेल भले सारे
वाटते इथल्या परी....
Sanjay R.
Monday, December 12, 2022
शब्दांची किमया
शब्दांची होते किमया
त्यात जीवनाचा सार ।
कधी करती ते घात
सुटतो पायाचा आधार ।
शब्दांनी जुळते नाळ
फुलते नात्याची माळ ।
कधी घेती वेध अंतराचा
हृदयात होतो जाळ ।
शब्दांनी भरतो प्याला
गोड अमृत त्याला ।
कधी वाटती ते काटे
करती घायाळ मनाला ।
Sanjay R.
ओळख
ओळख कशास हवी
अनोळखीच बरे ।
गुपित राहू दे सारे
नाही काहीच खरे ।
जग वाईट इथे
माणसेही वाईट ।
झोल झाल आत
वरूनच ते टाईट ।
शब्दांच्या मोहाचे जाळे
तोही ऐक सापळा ।
जातील चिरून कधी
कळणार नाही गळा ।
Sanjay R.
शोधू तुला मी कोठे
शोधू तुला मी कोठे
जग आहे किती हे मोठे ।
थकले डोळे हे आता
दिसते नजरेस सारे खोटे ।
शोधण्या माणूस निघालो
ठिकठिकाणी आहेत गोटे ।
ओलावा गेला सरून
मन झाले किती ते छोटे ।
स्वार्थ दडला मनात
ध्यास लागलेत मोठे ।
वाटतो माणुसकीचा अंत
भरलेत त्यानीच पोटे ।
Sanjay R.