Wednesday, December 7, 2022

सत्ताधारी

राज कारणी तू
तूच रे सत्ताधारी ।
सरली माणुसकी
झाला अविचारी ।
Sanjay R.


आश्वासन

नकोच तुमचे आश्वासन
बघून घेऊ आमचे आम्ही ।
मिरवून घेता स्वतःस
करताच काय हो तुम्ही ।
Sanjay R.


Monday, December 5, 2022

यवतमाळ जिल्हा साहित्य सम्मेलन 2022

4 डिसेंबर 2022 ला झालेल्या यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलनात सहभाग

Wednesday, November 30, 2022

कसा हा गारवा

कसा हा गारवा
झाली थंड हवा ।
निसर्गाने ओढला
नव रंग नवा नवा ।
दूर तिथे आकाशात
दिसे पाखरांचा थवा ।
चिव चिव त्यांची जशी
वाटे वाजतो पावा ।
Sanjay R.


पोटाची आग

भुकेचा उसळला डोंब
कळली पोटाची आग ।
चौत कोर पोळीसाठी
होते किती भागम भाग ।

कष्टासाठी पुढे येती हात
सोसतो कुणाचाही राग ।
झेलतो किती शब्दांचे वार
असतो तो सर्स्वाचा त्याग ।

अन्न पाणी अन् निवारा
गरजांचा घेतो मी माग ।
अंताचा होतो अनंत
विझते कुठे ती आग ।
Sanjay R.