Monday, December 5, 2022
Wednesday, November 30, 2022
कसा हा गारवा
कसा हा गारवा
झाली थंड हवा ।
निसर्गाने ओढला
नव रंग नवा नवा ।
दूर तिथे आकाशात
दिसे पाखरांचा थवा ।
चिव चिव त्यांची जशी
वाटे वाजतो पावा ।
Sanjay R.
पोटाची आग
भुकेचा उसळला डोंब
कळली पोटाची आग ।
चौत कोर पोळीसाठी
होते किती भागम भाग ।
कष्टासाठी पुढे येती हात
सोसतो कुणाचाही राग ।
झेलतो किती शब्दांचे वार
असतो तो सर्स्वाचा त्याग ।
अन्न पाणी अन् निवारा
गरजांचा घेतो मी माग ।
अंताचा होतो अनंत
विझते कुठे ती आग ।
Sanjay R.
झालो मी शून्य
तुझा असेल जो निर्णय
असेल मलाही तो मान्य ।
चला रे उचला मिळेल ते
घेऊन गेले सारे धन धान्य ।
बघतच राहिलो त्यांच्याकडे
कोण बोलणार तिथे अन्य ।
शब्दात पकडले त्यांनी मज
म्हणणार कसे मज हे अमान्य ।
सहजच गेलो बोलून मी सारे
आता बघा नजर झाली शून्य ।
Sanjay R.
Tuesday, November 29, 2022
अपेक्षा
नाही उत्तराची अपेक्षा
नको प्रश्नाचा अनर्थ ।
मनच कुठे उरले आता
त्यासी न कशाचा स्वार्थ ।
सारखा चालतो विचार
शब्दांचे जुळावितो अर्थ ।
जीवनाची हीच व्यथा
ऐकतो हाक ती आर्त ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)