Thursday, November 17, 2022

चंद्र हसतो गालात

वर बघतो तिथे मी
निळे निळे आकाश ।
चंद्र चांदणी येताच
होतो काळा प्रकाश ।

चमचमते चांदणी
चंद्र हसतो गालात ।
गगनात चाले खेळ
रात्रीच्या अंधारात ।

हळूच येतो वारा 
सळसळ होते झाडात ।
रातकिडे देई साद
होते धड धड मनात ।
Sanjay R.

निरागसता

तुझी हीच निरागसता
मनात घर करून गेली ।
माझा मी न उरलो आता
तहान भूकही तूच नेली ।
Sanjay R.


Monday, November 14, 2022

तान्हे बाळ

कधी हसे खुदकन
भाव निरागस बाळाचे ।
उघडुन डोळे दोन्ही
घेई दर्शन मग जगाचे ।
नाही ठाव कशाचा
कळेना काही मनाचे ।
लगता भूक जराशी
उठे सुर रडण्याचे ।
Sanjay R.


अनोखे नाते

आहे कसे हे सांग नाते
वाटे आम्हा हे जग खोटे ।
सोडले असे तू अधांतरी
तुझ्यासाठी रे काय मोठे ।

आई बापास तू विसरला
सांग फेडणार आमचे ऋण ।
संस्कार दिले तुला चांगले
घेतले कुठून असेल दुर्गुण ।

म्हातारपणी लागतो आधार
केला कसा रे तू विचार ।
त्याग विसरलास का आमचा
केले आम्हा असे लाचार ।

वृद्धाश्रमास या केले घर
सुखाचा तू कर संसार ।
जगू मरू आम्ही इथेच
नको करु आमचा विचार ।
Sanjay R.

चार ओळी

चार शब्दांच्या ओळी
हव्या मज तुझ्या
त्यास प्रितचा दे गंध
ठेवील हृदयात माझ्या
Sanjay R.