Friday, November 11, 2022

शब्द सार

शब्दामागे जुळती शब्द
भावनांचा तिथे आधार ।
भावनेला ठेवी जोडून
कथा कवितांचा तोच सार ।
Sanjay R.


कुठे आहेत प्रेमाचे वारे

जगभर कसे युद्धाचे वारे
कुठे आहेत प्रेमाचे वारे ।
अणू बॉम्ब ची देती धमकी
माणसांचे माणसांवर मारे ।
Sanjay R.


रंग प्रेमाचा

प्रेमाचे किती अर्थ
ज्यात असते ओढ ।
नको ते विचार येतात
तुटते जेव्हा जोड ।
जीव होतो अस्थिर
ही मनाची खोड ।
भाव भावनांचा खेळ
हे धर आणि ते सोड ।
Sanjay R.


निस्वार्थ हे प्रेम असे

निस्वार्थ प्रेम हे असे
देते आई बाळास जसे ।
होतात भावना मुक्त
स्वार्थ त्यात कसा दिसे ।
माया ममता ओढ जशी
तिथेच निस्सीम प्रेम वसे ।
नफा नुकसान नाही चिंता
ध्यास प्रेमाचा तिथे असे ।
प्रेमासाठी सारे भुकेले
त्यागा विना काहीच नसे ।
Sanjay R.


प्रेमाचा अर्थ

प्रेमाचा काय अर्थ
जाणतात सारे स्वार्थ ।
अजाण कोण इथे
त्यांचा तोच चरीतार्थ ।
दिखावा मात्र करती
त्यांचा तोच परमार्थ ।
Sanjay R.