Friday, November 11, 2022

बोल गाण्याचे

शब्दांनी दिली साथ
निघालो गीत गात ।
बोल दुःखाचे होते
सुखाचा नव्हता हात ।
आनंदाचा कुठे प्रकाश
जीवन काळोखी रात ।
भोग मी भोगतो सारे
नशीबाचीच ही बात ।
Sanjay R.


तुझ्या शब्दांचा सार

तुझ्या शब्दांचा सार
करतो मीही विचार ।
होऊन गीत फुलते
होतो आनंदाचा संचार ।

कधी गुणगुणतो ते शब्द
कधी भावनांशी जुळतो ।
कधी गालात मी हसतो
वाराही मग सळसळतो ।

मन झुलते दूर गगनात
साथ पक्षीही मग देतात ।
चोहीकडे होते किलबिल
वाटे गीत तुझेच ते गातात ।
Sanjay R.


शब्द सार

शब्दामागे जुळती शब्द
भावनांचा तिथे आधार ।
भावनेला ठेवी जोडून
कथा कवितांचा तोच सार ।
Sanjay R.


कुठे आहेत प्रेमाचे वारे

जगभर कसे युद्धाचे वारे
कुठे आहेत प्रेमाचे वारे ।
अणू बॉम्ब ची देती धमकी
माणसांचे माणसांवर मारे ।
Sanjay R.


रंग प्रेमाचा

प्रेमाचे किती अर्थ
ज्यात असते ओढ ।
नको ते विचार येतात
तुटते जेव्हा जोड ।
जीव होतो अस्थिर
ही मनाची खोड ।
भाव भावनांचा खेळ
हे धर आणि ते सोड ।
Sanjay R.