Thursday, November 10, 2022

साथ

अशी कशी ही साथ
नाही मदतीला हात
आस लावून बसतो मी
आणि होते सप्नांची वाताहात
Sanjay R.


लोभ

आयुष्यभर सोबतीला दुःख
मधे मधे मिळते मात्र सुख ।
हसत खेळत जगतो जीवन
तरी पैशाची थोडी असतेच भूक ।

पैसा पैसा सांगा पुरतो कुठे
लोभा मागे मग लोभ सुटे …।
नसेल जवळ जर पैसा
नाती गोती सारेच सुटे ।
Sanjay R.


अधीर मन

मन होते अधीर
सुचेना मग काही ।
होतात तुझे भास
शोधतो दिशा दाही ।
Sanjay R.


जीव गुंतला

गुंतला जीव माझा तुझ्यात
सांगतो आहे काय मनात
भास होतात सदा तुझेच
रमेना हे मन आता कशात
Sanjay R.


झेलू किती प्रहार

झेलू किती मी प्रहार
होतात किती वार ।
इकडे बघू की तिकडे
आहेत दिशा इथे चार ।
असह्य होते सारेच
सहन होईना मार ।
जड झाले सारे
उचलू कसा मी भार ।
जिकण्याचा विचार दूर
करतो स्वीकार हार ।
Sanjay R.