Thursday, October 13, 2022

कोजागिरी

पौर्णिमेचा चंद्र आज
घेऊन कोजागिरी आला ।
चंद्रप्रकाशात तापले दूध
अमृताचा गंध देऊन गेला ।
Sanjay R.


आई बाबा

हवे आई बाबांचे आशीर्वाद
यावर कोण करील वाद ।
तरीही मुलं का असे
त्याना एकदम विसरतात ।
Sanjay R.


वाटसरू

बांधली ही गाठ आहे
नाही आता कुठे वाट ।
प्रवास आहे हा दूरचा
चालायचे हाच परिपाठ ।

कठीण हा मार्ग कीती
विचारही नको आता ।
संकटांशी सामना
चल करू जाता जाता ।

दुखःविना सुख नाही
सुखाची ही वाट नाही ।
आटू दे अश्रू सारेच
अंत तोही किती पाही ।

बघूनच प्रण माझा
विचारात तोही जाईल
माझ्याविना सांग तू
सुखात तो कसा राहील ।
Sanjay R.


गातो मी अभंग

गातो मी अभंग
देवा तुझा संग ।

दिसे त्यातच रंग
झालो आता तंग ।

बांधला मी चंग
राहू दोघे संग ।

करू नको रे भंग
भक्तीत होईल दंग ।
Sanjay R.


स्वप्न छोटे मोठे

स्वप्नांच्या दुनियेत
काय खरे काय खोटे ।
स्वप्न मात्र बघतो मी
छोटे असो वा मोठे ।

कधी दिसतात तिथे
फक्त माती गोटे ।
कधी मी बघतो
माणसं छोटे छोटे ।

स्वप्नांचे मात्र कधी
असतात खूप तोटे ।
संकट येते तेव्हा
खावे लागतात खेटे ।
Sanjay R.