Saturday, September 24, 2022

लॉटरी

नशिबात नाही जोर
लॉटरी कशी लागेल ।
कष्टविना मिळेना काही
मेहनतीनेच नशीब जागेल ।

सहज मिळाले आयते तर
त्यास असतो एक धोका ।
किंमत नसते मग कशाची
घडतात आयुष्यभर चुका ।

कष्टविना सुख नाही
त्यातच मन होते प्रसन्न ।
आत्मचिंतन करून बघा
वाटेल तुमचे तुम्हास धन्य ।
Sanjay R.


मन गगनात घेते भरारी

क्षणात इथे तर
क्षणात असते तिथे ।
गगनात घेते भरारी
पोचते हवे तिथे ।
मधेच येते फिरून
नसेल कोणी कुठे ।
नाही अंत कशाचा
पचते मन तिथे ।
Sanjay R .


Tuesday, September 20, 2022

मनाचे रंग किती

मनाचे रंग किती
आहे किती गती ।
भ्रमण चाले सारे
नाही कुणाच्या हाती ।
अनंत त्याचे रूप
सखा तो सोबती ।
क्षणात देई सुख
पेटवी दुःखाच्या वाती ।
अभंगाचे होता भंग
दुरावते नाती गोती ।
Sanjay R.


फिकीर नाही कशाची

फिकीर नाही कशाची
काय अवस्था मनाची ।
काळजी म्हणू की चिंता
नाही कुणास जनाची ।
Sanjay R...

तुटतं मन

दणका दिल्याशिवाय
सांगा एकतं कोण ।
रोज रोज आपणच बोला
त्यांच्याकडे नसतो क्षण ।
एक घाव दोन तुकडे
असंच मग तुटतं मन ।
आकांत तांडव होईल आता
गाजेल मग सम्पूर्ण रण ।
Sanjay R.