Saturday, September 17, 2022

कोरोना काळ

कठीण होता तो
कोरोना काळ ।
जणू फाटले होते
वरती आभाळ ।
उठवसे वाटेना
झाली जरी सकाळ ।
सतत जीवाचा होता
नुसताच छळ ।
खिडीतूनच हो
बघायचो आभाळ ।
वाटायचं रोजच जणू
पडते का गळ्यात माळ ।
मीच बघायचो मला
दिसताच दूर जाळ ।
परतलो सुखरूप
शिजली आपली डाळ ।
म्हणतात लॉकडाऊनने
बरेच जन्मले बाळ ।
पण कठीणच होता हो
कोरोनाचा काळ ।
Sanjay R.


Wednesday, September 14, 2022

आवड

आहे एक माझी आवड
पण मिळते कुठे सवड ।
सांग शोधू कुठे आता
करू कशी मी निवड ।
ठरवतो मी मनात काही
पण असते ते अवघड ।
पूर्णत्वाला नेणं सारं
आहे किती हो जड ।
पोकळ थापा साऱ्या
असते नुसती बडबड ।
चुकले मुकले की मग
होते सारीच गडबड ।
Sanjay R....

एक होती राणी

होती एक राणी
नाव तिचे चांदणी
राजा होता चन्द्र
त्याची ती दिवाणी ।
अवकाश तिचे साम्राज्य
सोबतीला मंगळ शुक्र शनी ।
रडायची  ती ढगाआडून
पृथ्वीवर पाणी पाणी ।
अंधारात ती महाराणी
उजेडाला नसे कोणी ।
Sanjay R......


राजा राणी

संसार हा माझा
मी राजा ती राणी ।
सुख आणि आनंदाची
आहे ही कहाणी ।
साम्राज्य जरी माझे
करते तीच पहाणी ।
नजर करील कोण वाकडी
फिरेल त्याच्यावर पाणी ।
प्रत्येकाच्या संसारात
राणीच असते ज्ञानी ।
म्हणून घरोघरी चालते
गॉड मधुर गाणी ।
Sanjay R....


कोहिनुर

इंग्लंडची ती महाराणी
जगभरात तिचे साम्राज्य ।
एक शतकाचे तिचे वर्चस्व
एकाच क्षणात सरले ।
इतिहास झाली ती आता
बघा जीवनापुढे हरली ।
भारताचा कोहिनुर मुकुटात
आयष्यभर तिने मिरवला ।
घेऊन गेली काय सोबत
हक्क भारतीयांचा हिरावला ।
Sanjay R.