धडधड कोसळतो पाऊस
जिकडे तिकडे थैमान पुराचे ।
घराघरात पोचले पाणी
हाल किती हो जगण्याचे ।
होते नव्हते सारेच बुडाले
करू काय आता शेताचे ।
करू कसा मी संघर्ष आता
दिसते स्वप्नही फक्त मरणाचे ।
Sanjay R....
Wednesday, September 14, 2022
स्वप्न मरणाचे
Monday, September 12, 2022
आकाशाला कुठे अंत
आकाशाला कुठे अंत
क्षितीज ही कती अनंत ।
दाटते आभाळ काळे
वारा सोबतीला संथ ।
बरसतात पाऊस धारा
धारा मात्र असते शांत ।
मिलनाचे ते क्षण कसे
कोण कुठे असे निवांत ।
Sanjay R....
तू आणि मी
तेव्हा कधी तरी एकदा
वारा अगदीच होता शांत ।
तू आणि मी दोघेच तेव्हा
बसलो असेल निवांत ।
त्यादिवशीचा तो आपला
असेल पहिलाच एकांत ।
बोलायला नव्हते सुचत
शब्दही झाले होते संथ ।
सहजच मग बोलून गेलो
कशाला बघतेस तू अंत ।
बोल मनातलं तुझ्या काही
बाळगू नकोस तू खंत ।
बोलणे तूच सुरू केलेस
बाकी अजूनही ते अनंत ।
तेच शब्दांचे होते मिलन
संपूच नये आता अंता पर्यंत ।
Sanjay R....
Subscribe to:
Posts (Atom)