Friday, September 9, 2022

माणुसकीचा अंत

पोटासाठी चाले सारे
जीवन झाले कथा
ज्याचे तोच भोगतो
हीच जीवनाची व्यथा ।

दुःखाचा हा महासगर
आनंदाचा नाही पत्ता ।
हसत हसत भोगतो सारे
दारिद्र्याचीच महासत्ता ।

नाही कुणास देणेघेणे
माणुसकीचा झाला अंत ।
लुटारूंची फौज मोठी
कुणा म्हणू मी आता संत ।
Sanjay R.


इच्छाधारी नाग

इच्छाधारी नाग तो
असतो नेहमी रागात ।
जंगल सोडून तो मिळेल
माणसांच्याच भागात ।

डंख असतो धरून
विष भरलेलं मुखात ।
नाही बघवत त्याला
असेल कोणी सुखात ।

सदा चालते वळवळ
करायचे मधा मधात  ।
संग नकोच त्याचा
धोकेबाज तो जगात ।
Sanjay R.



मार्ग भक्तीचा

नाम घेऊ भगवंताचे
कर्म सारे जगण्याचे
आशा मनी उपजते
होते कल्याण जगताचे

भाव भक्तीचा सागर
भरते पुंण्याची घागर ।
मग्न भक्तिरसात सारे
चाले श्रद्धेचा जागर ।

कुठे कशाची शक्ती
चाले कुनाची युक्ती ।
कर्ता करविता तोच
सदा करू या भक्ती ।
Sanjay R....


आयत्या बिळात नागोबा

म्हणच आहे हो तशी
आयत्या बिळात नागोबा ।
दिवसभर असतो पसरून
फणकारतो कसा जागोबा ।
Sanjay R...


प्रेमाचे मागणे

हवं हवं जे वाटे
असू दे वाटेत काटे ।

झेलील त्रास सारा
प्रेमाचा संथ वारा ।

मनात सदा ओढ
नाही त्यावर तोड ।

मिळे नजरेला नजर
डोळ्यात दिसे असर ।

मन मनालाच छळी
भेट होता खुलते कळी ।

प्रेम आहे ज्याचे नाव
सुख दुःख त्यासी ठाव ।

प्रेम हेच आहे जगणे
प्रेमाचे प्रेमाला मागणे ।
Sanjay R....