फुलले चिखलात
गुलाबी हे कमळ ।
नशीब चिखलाचे
झाले सुंदर तळे ।
Sanjay R....
Saturday, September 10, 2022
गोष्ट प्रेमाची खरी
प्रेम म्हणजे काय
आहे एक स्टोरी ।
मन यात करते
मनाचीच चोरी ।
सांगणे कठीणच
हाती कुणाच्या दोरी ।
प्रेम कुठे तुटते
काळी असो वा गोरी ।
प्रेमासाठी काहीही
गोष्ट होच खरी ।
हसणे रडणे एकच
प्रेमात नसते दरी ।
Sanjay R....
देऊ निरोप आज बाप्पाला
देऊ निरोप आज बाप्पाला
दहा दिवस गेले सोबत
कमी नव्हते आनंदाला ।
सकाळ संध्याकाळ होई आरती
मोदक लाडू प्रसादाला ।
झगमग झगमग घरात होता
आशीर्वाद मिळे भक्ताला ।
गेलेत कसे दिवस सोबत
कळलेच कुठे आम्हाला ।
जायचा आज दिवस आला
आम्ही नमन करतो तुम्हाला ।
जयकार करू या मोरया
लवकर या पुढच्या वर्षाला ।
Sanjay R....
Friday, September 9, 2022
माणुसकीचा अंत
पोटासाठी चाले सारे
जीवन झाले कथा ।
ज्याचे तोच भोगतो
हीच जीवनाची व्यथा ।
दुःखाचा हा महासगर
आनंदाचा नाही पत्ता ।
हसत हसत भोगतो सारे
दारिद्र्याचीच महासत्ता ।
नाही कुणास देणेघेणे
माणुसकीचा झाला अंत ।
लुटारूंची फौज मोठी
कुणा म्हणू मी आता संत ।
Sanjay R.
इच्छाधारी नाग
इच्छाधारी नाग तो
असतो नेहमी रागात ।
जंगल सोडून तो मिळेल
माणसांच्याच भागात ।
डंख असतो धरून
विष भरलेलं मुखात ।
नाही बघवत त्याला
असेल कोणी सुखात ।
सदा चालते वळवळ
करायचे मधा मधात ।
संग नकोच त्याचा
धोकेबाज तो जगात ।
Sanjay R.