गरिबांचा कुठला मान
सदैव सोसतो अपमान
श्रीमंतांना बघा थोडे
जिथे तिथे त्यांचीच शान
पैश्या कडे त्यांचे ध्यान ।
विनाकारणचे देतात सल्ले
न मागता सांगतात ज्ञान ।
बेतते जेव्हा संकट स्वतःवर
विसरतात मग सारे भान ।
प्रतिक्रिया असते भारी
वाटते तेव्हा बरे लहान ।
Sanjay R.
Wednesday, August 31, 2022
श्रीमंत गरीब
कशास बदला
सन्मान करील तो आपला
अपमानाचा कशास बदला ।
पाप पुण्य जे ज्याचे त्याचे
फळ भेटते त्याचे तदला ।
गोड बोलुनी जिंका सारे
शब्दातूनच मिळतील तारे ।
कोण आपले कोण परके
कठीण प्रसंगी कळते सारे ।
संयम हवा थोडा वाचेवरती
समुद्रालाही तर येते भरती ।
क्षणिक असतो राग सारा
शहण्यास हो पुरे इशारा ।
Sanjay R.
Tuesday, August 30, 2022
त्राही त्राही
जय जय शिवराय
स्वराज्यासाठी कितीकांनी
दिले प्राणाचे बलिदान ।
देऊनिया प्राण आपुले
झालेत किती महान ।
मराठ्यांचा इतिहास हा
महाराष्ट्राची शान ।
जय जय शिवराया
तुम्हास आमचा प्रणाम ।
Sanjay R.
प्रेमाला कुठे अंत
प्रेमाला कुठे अंत
वाहतं पाणी
आणि तेही संथ ।
नाही वयाचे बंधन
म्हातारं झालं जरी
हृदयात होते स्पंदन ।
नाती गोतीही सरतात
प्रेमापुढे विचारही
का कसे ते हरतात ।
प्रेमात कुठला स्वार्थ
पण असतो नक्कीच
जीवनाला तिथे अर्थ ।
प्रेम म्हणजे भक्ती
अति प्रचंड अशी ती
असते एक शक्ती ।
म्हणे प्रेमात तो पागल
कळेना कुणासच
अंतापर्यत तो जागल ।
प्रेम कराल तर कळेल
कुणासाठी माझंही हो
मन तितकंच जळेल ।
Sanjay R.