Tuesday, August 30, 2022

हास्य आनंद

रंग कसा या जीवनाचा
गन्ध त्यात भावनांचा ।

क्रोधाला नाही माया
सोबत असते सदा छाया ।

शब्दातून शब्द येतात
घायाळ मन करून जातात ।

चेहऱ्यावरती भाव कसे
राग क्षणात उठून दिसे ।

रूप नको ते तसे मजला
हास्य हवे ते देईल तुजला ।

हृदयावरती बंधन कुठले
होऊन आनंद सारे सुटले ।
Sanjay R.


नकोच हा दुरावा

नकोच हा दुरावा
असेल तू दूर जरी ।
नेहमीच वाटे मनाला
नकळत येतील सरी ।
क्षणोक्षणी होतात भास
कथा ती असेल खरी ।
रंभा किव्वा उर्वशी
इंद्राघरची ती तूच परी ।
Sanjay R


विसावा

करतो देवाचा धावा
करू नको दुरावा ।
आलो शरण तुजला
हवा कशाला पुरावा ।
तूच आहेस तारक
हात कृपेचा असावा ।
चरणी तुझ्याच आलो
दे मज तूच विसावा ।
Sanjay R.


माया

मनात जरी असेल
आपलेपणाचा ओलावा ।
पण स्वार्थ येतो आडवा
आणि वाढतो दुरावा ।

उरलीच कुठे माणुसकी
फालतुचेच होतात दावे ।
वेळ आली की कळते
गुणगान कुणाचे गावे ।

शब्दा शब्दात अंतर किती
कुठे काळोखाची काया ।
कधी सहजच जाणवते
शब्दातून किती माया ।
Sanjay R.


नको होऊस तू परदेशी

होऊ नको तू परदेशी
बघ तुझी रे आई कशी ।

वाट तुझी पाहते सारखी
आठवणीत ती होते दुःखी ।

काळजी सदा तुझीच तिला
आठवण कारे येत नाही तुला ।

गरज तुझीच रे म्हातारपणी
तुजविन सांग बघेल का कोणी ।

लाड तुझे रे का केलेत कमी
नको देउ आता डोळ्यांना नमी ।
Sanjay R.