Wednesday, August 24, 2022

नकोच हा दुरावा

नकोच हा दुरावा
असेल तू दूर जरी ।
नेहमीच वाटे मनाला
नकळत येतील सरी ।
क्षणोक्षणी होतात भास
कथा ती असेल खरी ।
रंभा किव्वा उर्वशी
इंद्राघरची ती तूच परी ।
Sanjay R


Tuesday, August 23, 2022

हास्य आनंद

रंग कसा या जीवनाचा
गन्ध त्यात भावनांचा ।

क्रोधाला नाही माया
सोबत असते सदा छाया ।

शब्दातून शब्द येतात
घायाळ मन करून जातात ।

चेहऱ्यावरती भाव कसे
राग क्षणात उठून दिसे ।

रूप नको ते तसे मजला
हास्य हवे ते देईल तुजला ।

हृदयावरती बंधन कुठले
होऊन आनंद सारे सुटले ।
Sanjay R.


प्रेमाला कुठे अंत

प्रेमाला कुठे अंत
वाहतं पाणी 
आणि तेही संथ ।

नाही वयाचे बंधन
म्हातारं झालं जरी
हृदयात होते स्पंदन ।

नाती गोतीही सरतात
प्रेमापुढे विचारही
का कसे ते हरतात ।

प्रेमात कुठला स्वार्थ
पण असतो नक्कीच
जीवनाला तिथे अर्थ ।

प्रेम म्हणजे भक्ती
अति प्रचंड अशी ती
असते एक शक्ती ।

म्हणे प्रेमात तो पागल
कळेना कुणासच
अंतापर्यत तो जागल ।

प्रेम कराल तर कळेल
कुणासाठी माझंही हो
मन तितकंच जळेल ।
Sanjay R.



Sunday, August 21, 2022

शुक्राची चांदणी

रातराणी ती कोण
करते कशी चमचम ।
दडली का ढगाआड
बरसतो पाऊस झमझम ।
शुक्राची ती चांदणी
लोपला तिचा दम ।
चंद्रही हिरमुसला
डोळे त्याचे नम ।
Sanjay R.


रातराणी

दरवळतो सुगन्ध
बहरते रात राणी ।
धुंद होते रात्र
गाली हसते चांदणी ।
चन्द्र देतो पहारा
रजनी गाते गाणी ।
सकाळ होता ऐकायची
सूर्याची कहाणी ।
Sanjay R.