Wednesday, August 17, 2022
नटू दे अंगण
गेला वाटतं पाऊस
नारायणाने दिले दर्शन ।
आकाश झाले स्वच्छ
सूर्यप्रकाश केला अर्पण ।
पाखरांची झाली किलबिल
धरेचा फुलला कणकण ।
थांब थांब पावसा आता
नटू दे धरेचे अंगण ।
Sanjay R.
Tuesday, August 16, 2022
भरोसा
हक्क माझा हक्क तुझा
नाही इथे कुणाचा ।
मग सरेल जेव्हा हक्क
सांगा कोण कुणाचा ।
वाटे तसे चाले सारे
सारा खेळ मनाचा ।
संगनमताने न चाले काही
भरोसा कुठे क्षणाचा ।
Sanjay R.
हक्काची लढाई
लढू चला आता
आपल्या हक्काची लढाई ।
दुर्बलांवर नको मात्र
स्वतः साठी चढाई ।
दुसऱ्यांचे हक्क मारून
बरेच मारतात बढाई ।
किंमत मोजावी लागते
कराल ज्याची मढाई ।
Sanjay R.
हक्क स्वातंत्र्याचा
जन्मतः मिळाला आम्हा
हक्क या स्वातंत्र्याचा ।
पारतंत्र्य असते काय
संबंध कुठे कशाचा ।
विचारांना आहे वाव
सांभाळ होतो मनाचा ।
अस्तित्वाचे भान कुठे
विचार फक्त जीवनाचा ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)