Friday, August 12, 2022

स्पर्धा

अविरत चाले हा प्रवास
आयुष्याचा वेळ त्यात अर्धा ।
थांबतो कोण कुणासाठी
इथे रोजच  तर असते स्पर्धा ।
Sanjay R.


इशारे

नको वाटते सारे
चुकवू किती पहारे ।
मन कुठे थांबते
देते सारखे इशारे ।
मोजता येईना कधी
आकाशातले तारे ।
स्पर्श करून जातात
अवखळ ते वारे ।
Sanjay R.


लढाई

पैज लागली जगण्याची
जिंकतो कोणी हरतो ।
लढता लढता एक दिवस
प्रत्येक स्पर्धक हरतो ।
असते लढाई सुरूच
कसा कोण कुठे सरतो ।
मधेच पलटते बाजी
जुना जाऊन नवा येतो ।
जवाबदारी माथ्यावरती
कास जीवनाची धरतो ।
Sanjay R.


Thursday, August 11, 2022

नाते भाऊ बहिणीचे

नाते भावा बहिणीचे
बांधले एका धाग्याने ।
मायेचा ओलावा तिथे
बांधला आहे प्रेमाने ।
Sanjay R.


Wednesday, August 10, 2022

कोण छोटा कोण मोठा

असेल जवळ पैसा
आवाज त्याचा मोठा
रिकाम्या खिशाचा हो
आव असतो खोटा ।

कष्टाने कुठे तो येतो
दिसतो नुसता तोटा ।
नसेल तो ज्याच्याकडे
म्हणतात त्याला छोटा ।

कोण छोटा कोण मोठा
जड किती पैशाचा गोटा ।
उचला हात लवकर आता
जाऊन पैशालाच भेटा ।
Sanjay R.