पैज लागली जगण्याची
जिंकतो कोणी हरतो ।
लढता लढता एक दिवस
प्रत्येक स्पर्धक हरतो ।
असते लढाई सुरूच
कसा कोण कुठे सरतो ।
मधेच पलटते बाजी
जुना जाऊन नवा येतो ।
जवाबदारी माथ्यावरती
कास जीवनाची धरतो ।
Sanjay R.
Friday, August 12, 2022
लढाई
Thursday, August 11, 2022
Wednesday, August 10, 2022
कोण छोटा कोण मोठा
असेल जवळ पैसा
आवाज त्याचा मोठा
रिकाम्या खिशाचा हो
आव असतो खोटा ।
कष्टाने कुठे तो येतो
दिसतो नुसता तोटा ।
नसेल तो ज्याच्याकडे
म्हणतात त्याला छोटा ।
कोण छोटा कोण मोठा
जड किती पैशाचा गोटा ।
उचला हात लवकर आता
जाऊन पैशालाच भेटा ।
Sanjay R.
Tuesday, August 9, 2022
पैशाला आहे वाचा
पैशाला आहे वाचा
बोल त्याचे मोलाचे ।
होताच थोडे जास्त
भान हरपते तोलाचे ।
सहज मिळेना पैसा
हवेत कष्ट अपार ।
लोभ मोह नको काही
हवेत थोडे शुद्ध विचार ।
पैशाविना न मिळे काही ।
तरी पैशाची किंमत नाही ।
जीवनाचा या एकच पाया
प्रेमाविना नाही काही ।
Sanjay R.
प्रत्येकाची येते वेळ
चालतो सारा खेळ
पैशाविना नाही मेळ ।
श्रीमंत कुणी गरीब इथे
प्रत्येकाची येते वेळ ।
वरचा कधी जातो खाली
खालून येतो दुसरा वर ।
आकाशाला नाही भिंती
ताकद ज्याची करतो सर ।
पैसा पैसा जो जो करतो
पैश्याविनाच तोही सरतो ।
सोडून इथेच जातो सारे
असून पैसा जीवन हरतो ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)