असेल जवळ पैसा
आवाज त्याचा मोठा
रिकाम्या खिशाचा हो
आव असतो खोटा ।
कष्टाने कुठे तो येतो
दिसतो नुसता तोटा ।
नसेल तो ज्याच्याकडे
म्हणतात त्याला छोटा ।
कोण छोटा कोण मोठा
जड किती पैशाचा गोटा ।
उचला हात लवकर आता
जाऊन पैशालाच भेटा ।
Sanjay R.
असेल जवळ पैसा
आवाज त्याचा मोठा
रिकाम्या खिशाचा हो
आव असतो खोटा ।
कष्टाने कुठे तो येतो
दिसतो नुसता तोटा ।
नसेल तो ज्याच्याकडे
म्हणतात त्याला छोटा ।
कोण छोटा कोण मोठा
जड किती पैशाचा गोटा ।
उचला हात लवकर आता
जाऊन पैशालाच भेटा ।
Sanjay R.
पैशाला आहे वाचा
बोल त्याचे मोलाचे ।
होताच थोडे जास्त
भान हरपते तोलाचे ।
सहज मिळेना पैसा
हवेत कष्ट अपार ।
लोभ मोह नको काही
हवेत थोडे शुद्ध विचार ।
पैशाविना न मिळे काही ।
तरी पैशाची किंमत नाही ।
जीवनाचा या एकच पाया
प्रेमाविना नाही काही ।
Sanjay R.
मित्र जरी गेले दूर पण
आठवणी कुठे जातात ।
क्षणन क्षण आठवतो जेव्हा
उठते वादळ अंतरात ।
सुख दुःख दोन्ही जिथे
चित्र बदलते एकच क्षणात ।
भावना मात्र अजूनही त्याच
साठलेल्या आहेत मनात ।
Sanjay R.