हवी जीवनाची साथ
सोबतीला हवेत हात ।
हवा एक विश्वास सदा
नको मनाला आघात ।
होईल अंधार लुप्त
जळता एकची वात ।
मिळेल हवे ते सारेच
हवी फक्त मैत्रीची साथ ।
Sanjay R.
बंध तुझ्या माझ्यात
मैत्रीतून जुळले नाते ।
नकोच दुरावा आता
साद अंतरातून येते ।
आठवण होते जेव्हा
समोर मग तूच येते ।
तुझ्याविना सारे शून्य
क्षणा क्षणाची याद येते ।
Sanjay R.
आठवणीत ती सारी गाणी
गुणगुणतो मी माझ्या मनी ।
मनात भरतो उल्हास आनंद
शब्द गाण्यांचे पडताच कानी ।
Sanjay R.
सर सर येऊन
गेला पाऊस ।
भिजले अंग
झाली हौस ।
ओल्या मातीचा
गंध सुटला ।
झाडावरचा
पक्षी उठला ।
जाऊ कुठे
मी धावू कुठे ।
काही सुचेना
गाऊ कुठे ।
Sanjay R.