Monday, July 25, 2022

राजेशाही

कोण राजा कोण रंक
सम्पला तो नाटकाचा अंक ।

राजा गेला उरली प्रजा
वाटेल तशी सुरू आहे मजा ।

राजा राणी कथेत उरली 
राजकुमारी केव्हाच हरली ।

मी मी म्हणतो राजकुमार
जगणे त्याचे चाले उधार ।

गेलेत सारे संत्री मंत्री
उरलेत फक्त पातळ तंत्रि ।
Sanjay R.

Saturday, July 23, 2022

आठवणी किती

आठवणी किती
साठलेल्या या मनात ।
भराभर येती पुढे
फक्त काही क्षणात ।

याद होते जेव्हा
धरतात फेर मनात ।
कधी मुखावर हास्य
कधी पाणी डोळ्यात ।
Sanjay R.


पाणीच पाणी

नको त्या आठवणी
नको ते विचार ।
वाळूचे घर बांधले
लाटेपुढे होते लाचार ।

जिकडे तिकडे पाणीच पाणी
नाही कशाचाच आधार ।
सतत पडतोय हा पाऊस
सोबत डोळ्यांनाही धार ।

घराला तर छत नाही
उरल्या कुठे भिंती चार ।
शेतात नुसतेच पाणी
डोक्यावर कर्जाचा भार ।

तापाने नुसता फणफणतो 
अंग ही  पडले गार ।
हसू कसा रडू कसा 
जीवनाचा तर हाच सार ।
Sanjay R.

Friday, July 22, 2022

रेशमी धागा

बंध प्रेमाचा कसा
जसा रेशमी धागा ।
तुटेल कसा सहज
अंतरात ज्याची जागा ।
Sanjay R.


पिंजरा

मन माझे पिंजरा
बंद त्यात भावना ।
बघतो दूर गगनात
जाऊ कुठे कळेना ।
Sanjay R.