पडेल कसा कमी
माझा आत्मविश्वास ।
मोकळ्या हवेत मी
घेतोच आहे श्वास ।
नाही उरलेत आता
काही कशाचे ध्यास ।
स्मरण होताच तुझे
मिळतो मज विश्वास ।
Sanjay R.
Friday, July 22, 2022
विश्वास
आत्मविश्वास
मनात एकच ध्यास
करितो तयाचे प्रयास ।
अजूनही आहे विश्वास
भरतो एक एक श्वास ।
नाहीत आता आभास
आहे फक्त आत्मविश्वास ।
Sanjay R.
प्रेमाची वाट
कुठे थांबते ही वाट
एकदा होताच गाठ ।
वळणा वरून फिरते
सुटेना क्षणभर पाठ ।
लगबग ज्याची किती
सोडवेना कधी काठ ।
परतते आली जशी
जणू सागराची लाट ।
आठवण सुटता सुटेना
हृदयात रुतून दाट ।
रात्र निघते जागून
केव्हा होईल पहाट ।
हरपते भान सारे
विचार होतात सैराट ।
नकळत वळती पाऊले
सुखावते प्रेमाची वाट ।
Sanjay R.
वाट
वाट कुठे ही साधी सरळ
काटे कुटे त्यात किती ।
मनात भरते धडकी
मग वाटते सारखी भीती ।
मनात सारखी चिंता
वाटे कशास मारली मती ।
थांबतात अचानकच श्वास
कधी थांबते हृदयाची गती ।
वाट जरी ही वाटे प्रेमाची
कठीण आहे ही अती ।
जपून चाला या वाटेवर
जायचे असेल जर सती ।
Sanjay R.
डोळ्यांची भाषा
डोळ्यांची भाषा सांगा
कुणास कळेना ।
भाव मनातले होतात व्यक्त
वाटते बघावे परत पण
मानच हो वळेना ।
Sanjay R.