Friday, July 1, 2022

आहेस तू परी

कुकुली छोटुली
आहेस तू परी
गोड किती हसते
लाडू बाई बरी ।
आईची छकुली
असली जरी ।
बाबांची लाडकी
आहेस खरी ।
Sanjay R.


दुःख विना सुख कुठे

दुःखा विना सुख कुठे
सुख दुःखात काय मोठे ।
आयुष्याच्या वाटेवरती
काही खरे काही खोटे ।

दुःख देई मार्ग नवा
सुख तर मागे लोटे ।
दुःख असे क्षणिक सारे
शोधा जरा सुख कोठे ।
Sanjay R.


क्षणभर सुख

क्षणभर सुख कशात
मिळता हवे जे मनात ।
होता कार्याची सुरुवात
थोडी कष्टाची हवी साथ ।
सिद्धीस जाते सारेची
फळ लाभते हातात ।
जेव्हा आशा असे मनात
परिणाम कुठे दुःखात ।
सुख मिळते आनंदात
मिळेल कसे क्षणात ।
Sanjay R.


Thursday, June 30, 2022

गुन्हा काय माझा

कधी पडतो पाऊस खूप
कधी दिसेचना त्याचे रूप ।

येतात कधी वादळ वारे
हाती निसर्गाच्या हे सारे ।

नसते कमी मेहनत माझी
पण नाही कुणा कदर त्याची ।

फळ मेहनतीचेही का मिळेना
गुन्हा काय माझा काहीच कळेना ।
Sanjay R.


जग लय बेकार

भाऊ दूर नको जाऊ
जग लय बेकार ।
डोळे उघडून पाय
खाऊन पिऊन देते डकार ।
वरून तुले म्हणन
लयच होता तू गा टिकार ।
पायजो बापू अजून कोनी
यक अजून शिकार ।
आमचा त ह्या धंदाच हाये
मातर तू करू नोको नकार ।

Sanjay R.