Thursday, June 16, 2022

कशी ही जादू

कशी ही जादू
कसा हा टोना ।
जगतो जीवन
पण एकच रोना ।

रडतो जास्त
पण हसतो कमी ।
दिसेल डोळ्यात
नेहमीच नमी ।

आसवांचे इथे
काय मूल्य ।
दाबून टाकायचे
मनातले शल्य ।

उठून लागतो
जेव्हा वाटेला ।
खिळावे वाटते
धरून खाटेला ।

वाटतं मला
मीच लाचार ।
सुख विसरतो
दुःखाचा प्रचार ।
Sanjay R.


प्रथा गावो गावी

सक्काळी सक्काळी
जावे आपल्या गावी ।
स्वागताला हजर सारे
गोष्ट ही नाही हो नवी ।
रहस्य कुठले नाही यात
जो तो वेशिकडे धावी ।
प्रथा ही दिसेल तुम्हा
प्रत्येकच गावो गावी ।
Sanjay R.
😊😊😊😊


Tuesday, June 14, 2022

बालपणीच्या आठवणी

बालपणीच्या त्या आठवणी
वाटतं परत व्हावं लहान ।
खेळावं बागडावं मस्त उडावं
परत शाळेत जावं छान ।

मित्रांशी घालावा तसाच गोंधळ
नवे कपडे घालून मारावी शान ।
खोड्या काढाव्या कुणाच्याही
जेव्हा नसता कुणाचेच भान ।

काढून एक चित्र गुरुजींचे
फाडावे तसेच वहीचे पान ।
गुरुजींचा पडता मार मग
व्हावे अजूनच खूप लहान ।

आईचा मार बाबांचा धाक
पाठीवरच्या वळांचे ते निषाण ।
परत वाटतं हवं हवं सारं
व्हायचं मला परत एकदा अजाण ।
संजय रोंघे


गावाचे रहस्य

सगळेच जिथे रहस्य
तेच ते आहे गाव ।
असू द्या ना काहीही
त्या छोटया गावाचे नाव ।

झुळ झुळ वाहते नदी
निसर्ग घेतो मन मोहून ।
आंबा चिंच गोड आंबट
तोडावी वाटते धावून ।

मूठभर  दाणे पेरायचे
पोते भरून आणायचे ।
काय किमया होते बघा
रहस्य तिथल्या मातीचे ।

माणसंही साधी भोळी
लळा लावून जातात ।
गरीब असला तरी हो
श्रीमंती त्यांच्या प्रेमात ।

अशी कित्येक रहस्य
दडलीत त्या गावात ।
एकदा फक्त जाऊन बघा
कळेल सारे एका डावात ।
Sanjay R.


Monday, June 13, 2022

मित

कळले मज सारे
कशात माझे हित ।
वागणे तुझे बघ
आहे कशी ही रीत ।
हरणार सांग कशी
होईल तुझी जित ।
माझी तू मी तुझा
ही आपली मित ।
बहरू दे आता
तुझी माझी प्रीत ।
Sanjay R.