Wednesday, January 12, 2022

भविष्य

भविष्यात घडेल काय
आयुष्यात जडेल काय ।
शोधतो हातावरच्या रेषा
त्यावर आहे लिहिले काय ।
जन्माला आलो मी जसा
सांग कसे मानू आभार माय ।
कर्तृत्व करण्या आहेत हात
यश तिथे जिथे पडतील पाय ।
Sanjay R.

Saturday, January 8, 2022

माणूस

माणसाच्यानात काय
ओळखणे महाकठीण ।
कधी जळता निखारा
होती कधी तो लिन ।
कळेना केव्हा करेल काय
विचारानेच येतो शीण ।
वाटे कधी  जुनाट  किती
कधी वाटे तोच तर नवीन ।
Sanjay R.

Thursday, January 6, 2022

उपेक्षा

ओझे उपेक्षांचे पाठीवर
करतात घाव मनावर ।
अंतरात या जखमा किती
ओघळती आसवे गालावर ।
एकटाच मी भोगतो सारे
मिळेना उपाय जगण्यावर ।
बघतात का  दुरूनच सारे
टाकतो नेऊन हसण्यावर ।
दुःखाला असे कोण सोबती
मग होतो सुखाचा वाटेकरी ।
Sanjay R.


दिसते कुठे काही

बोलू नकोस काही
मज अपेक्षाही नाही ।
अक्षरात शोधतो मी
दिसते कुठे काही ।

भाव तोच मनात
डोळे वाट पाही ।
मन झाले अधीर
शोधतो दिशा दाही ।

पुरे एक इशारा
त्यातच सर्व काही ।
करू नकोस वेळ
अंतराची होते लाही ।
Sanjay R.


वाहरे वा कोरोना

वाह रे वा कोरोना
तू आलास का परत ।
करमत नसेल ना तुला
माणसं का नाही मरत ।

कितिकांना घेऊन गेलास
पाणी डोळ्यात तू भरत ।
तरी दोन वेळा घेतली लस
पण कारे तूच नाही मरत ।

आप्त गेले पैसा गेला
अजूनही आहेत ते रडत ।
जगण्यासाठी बघ कसे ते
आहोत रे आम्ही लढत ।

मास्क लावला हातही धुतले
स्यानिटायझर आहोत मळत ।
कोणी म्हटलं येतो घरी तर
नको येऊस उत्तर देतो पळत ।

शाळा बुडली नोकरी गेली
संसार किती आहेत जळत ।
सोडणारे भाऊ पाठ आता
हे तुलाच कारे नाही कळत ।

सरकारचे तर नियम भारी
तरीही सारेच आहेत पाळत ।
चिंता लागली साऱ्यांनाच
असतो एकमेकास टाळत ।

देऊ नकोस रे दुःख आता
बसणार किती तू छळत ।
मनात या भीती किती
विचारही नाहीत ढळत ।
Sanjay R.