Saturday, December 18, 2021

गुंता

सोडवू कसा मी गुंता
गुंतून पडलो मी इथे ।
गुरफटलो कसा तयात
जाऊ कसा मी तिथे ।
वाट ही अवघड किती
शोधू मी काय इथे ।
सरेल का वाट कधी
जायचे मज आहे जिथे ।
Sanjay R.









मुंगी साखरेचा रवा

मुंगी साखरेचा रवा
म्हणे हवा तिला खवा ।
नको जाऊ सांगे सारे
तरी खवाच तिला हवा ।
ऐकेना काहीच कुणाचे
कसा जोम तिचा नवा ।
पडली जेव्हा उलटून
म्हणे मदतीला धावा ।
कोण कुणासाठी येतो
बघ तुझे तूच रे बावा  ।
Sanjay R.


जाई गालात हसते

अंगणात फुलला गुलाब
मोगरा दुरून हसतो ।
जास्वन्द मिरवतो डोलात
खुशीत चाफाही दिसतो ।

बहरली कशी रातराणी
गंध तिचा दरवळतो ।
गार गार वाऱ्या सांगे
निशिंगन्धही सळसळतो ।

उघडून डोळे मग बघते
शेवंती पाणाआड़ दडते ।
लाजत मुरडत कशी ती
जाई जुई  गालात हसते ।
Sanjay R.


Friday, December 17, 2021

प्रवास

शोधू कुठे मी मला
मायाजाळ हे इथे ।

गुरफटलो मी त्यात
भटकतो इथे तिथे ।

सम्पेल का अस्तित्व
असेल मग मी कुठे ।

स्वार्थी जगात शोधतो
निस्वार्थ जागा जिथे  ।

पळापळ चालली सारी
थांबेचना कोणी कुठे ।

बघता बघता मग सरतो
प्रवास जीवनाचा इथे ।
Sanjay R.



Thursday, December 16, 2021

आधार

कुणाला कुणाचा आधार
होतो कमी थोडा भार
असते जेव्हा जिंकायचे
नकोच वाटते मग हार ।
पेच सारेच या आयुष्यात
मनही सदा करी विचार ।
सर्वस्व लावूनी पणाला
स्वप्न होते मग साकार ।
खुलतो मार्ग आनंदाचा
हाची जीवनाचा सार ।
Sanjay R.