Friday, December 17, 2021

प्रवास

शोधू कुठे मी मला
मायाजाळ हे इथे ।

गुरफटलो मी त्यात
भटकतो इथे तिथे ।

सम्पेल का अस्तित्व
असेल मग मी कुठे ।

स्वार्थी जगात शोधतो
निस्वार्थ जागा जिथे  ।

पळापळ चालली सारी
थांबेचना कोणी कुठे ।

बघता बघता मग सरतो
प्रवास जीवनाचा इथे ।
Sanjay R.



Thursday, December 16, 2021

आधार

कुणाला कुणाचा आधार
होतो कमी थोडा भार
असते जेव्हा जिंकायचे
नकोच वाटते मग हार ।
पेच सारेच या आयुष्यात
मनही सदा करी विचार ।
सर्वस्व लावूनी पणाला
स्वप्न होते मग साकार ।
खुलतो मार्ग आनंदाचा
हाची जीवनाचा सार ।
Sanjay R.


येईल परत बहार

शुधु कुठे मी आता
होता तुझाच आधार ।
तुझ्याविना मी तर
वाटे मज मी लाचार ।
सांगू कुणास मी आता
चाले तोच विचार ।
टाकले बदलून सारे
माझे मीच आचार ।
ये परतून ये पाखरा
वाजू दे तुझी सतार ।
फुलेल हास्य या गाली
येईल परत बहार ।
Sanjay R.


Wednesday, December 15, 2021

थंडी आली आता

सुचेना मला काही
काय सांगू आता ।

डोकेच झाले शांत
थंडी आली आता ।

थरथर कापे अंग
शब्द निघेना आता ।

नाही सुचत काही
झाल्या बंद बाता ।

थंडीचा हा प्रकोप
करू काय आता ।

बसू चला शेकोटीशी
थंडीत कुठे जाता ।

गरम चहाचा कप
थंड झाला हो आता ।

बोल निघे बोबडे
सांगा कसे हो गाता ।

घालू चला स्वेटर
थंडी पळेल स्वतः ।

बचाव होईल थोडा
रजईत लपू आता ।
Sanjay R.


करू काय नि काय नको

करू काय नि काय नको
कळत का मलाच नव्हते ।
विचारांचा भार किती 
माझे मलाच मी छळले होते ।
उधळले स्वप्न सारे
संकट का ते टळले होते ।
धूसर झाले सारे आकाश
मनात काय जळले होते ।
डोळ्यापुढे चित्र उभे
काहीच का दिसत नव्हते ।
पडद्या आड काय चाले
मन माझे हसत होते  ।
आरश्यात मी काय बघतो
रूप माझेच दिसत नव्हते ।
Sanjay R.