कारावे काय आता
भावना गेल्यात मरून ।
नाही उरले मनात
ठेऊ कसे मी धरून ।
जीवन झाले कठीण
करावे किती करून ।
मार्गच दिसेना आता
देतो सारेच सारून ।
Sanjay R.
Friday, December 3, 2021
भावना गेल्यात मरून
Monday, November 29, 2021
काय म्हणतोस तू
काय म्हणतोस सांग तू रे,
गालात मी हसू कसे रे ।
जमेल कसे ते सांग मजला,
तुही मलाच फसवू नको रे ।
तोंडात नाही एकही दात,
हसताना ते दिसवू कसे रे ।
चष्म्याची काच ही भिंग झाली
डोळ्यांना माझ्या रुसवू नको रे ।
गालावरती पडल्या वळ्या
दिसते तुला ती खळी कुठे रे ।
कानही सांगू तीक्ष्ण किती ते,
आवाज वाटतो सूक्ष्म किति रे ।
डोक्यावरती टक्कल पडले
उडणारे ते केस कुठे रे ।
उठणे होईना बसणे होईना,
कंबर झुकली, उभेच राहवेना ।
तलवार गेली लाठी आली,
हातात काठी दिसते कशी रे ।
बोल म्हणतो गोड किती रे
बोबडे शब्द ओठच गाती रे ।
सोळाची मी, तू सताराचा
वय किती ते सांगू कशी रे।
म्हातारपण हे कुठे थांबते
खो खो करणे थांबवू कसे रे ।
लाल पिवळे रंग फासूनी
सुंदर आता मी दिसू कशी रे ।
वाट पाहते होईल कधी मी
आकाशाची चांदणी मी रे
Sanjay R.
छळ
गुंतलो किती नात्यात या
माझाच मी मज छळतो ।
अंतरात या यातना किती
का असा मी मीच जळते ।
शोधू कुठे मी गार वारा
कशास असा रे मज छळतो ।
इथे शोधू की तिथे शोधू मी
जीवन कसे हे मीच पळतो ।
थांबू कुठे मी बळ हे सरले
आकाशातला तयार ढळतो ।
Sanjay R.
भरारी
पंख लागलेत तुला
ये चल घे आता भरारी ।
करायचे क्षितिज पार
राहू नकोस उभा दारी ।
पंखात तुझ्या बळ किती
बघायची तुज धरा सारी ।
प्रत्येक क्षण एक वेगळा
झेलयचे बाण विषारी ।
Sanjay R.
Saturday, November 27, 2021
नोंद
नकोच वाटते नोंद कशाची
काय काय ठेवायचे लक्षात ।
दूर नकोच वाटते सारे
हवे मजला सारे साक्षात ।
Sanjay R.