कळ्यांची झाली फुले
दूर सुगंध दरवळला ।
हळुवार सुटला वारा
पानाफुलात सळसळला ।
सागरास आली भरती
होवुन लाट खळखळला ।
आनंद मावेना गगनी
जणू उत्साहच फळफळला ।
Sanjay R.
नाते जिवाभावाचे
सहजच मिळते साथ ।
मैत्रीचे हे नाते घट्ट
नेहमीच मिळतो हात ।
सुख असो वा दुःख
मदतीला नसते वाट ।
तुटत नाही कधीच
आयुष्यभर ही गाठ ।
Sanjay R.
किती बांधायचे कयास
पडतात कमीच प्रयास ।
मनात सारखा ध्यास
मग होतात आभास ।
कधी थांबतात श्वास
निघतो सुटकेचा निश्वास ।
नकोच आता कयास
नकोत कुठले प्रयास ।
मनी देवाचीच ध्यास
थांबेवरी हे श्वास ।
Sanjay R.